वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोनाकाळात झालेल्या नुकसानाची भरपाई व्हावी आणि व्यापारउदीम, उद्योगधंदे सुरू व्हावेत, जेणेकरून अर्थव्यवस्था रुलांवर येईल, या हेतूने केंद्र सरकारने विशेष आर्थिक देऊ केली. आता आणकी एक विशेष आर्थिक पॅकेज लवकरच जाहीर केले जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली.

तरुण बजाज म्हणाले, हे विशेष आर्थिक पॅकेज नेमके कधी घोषित होईल ते सांगणे सध्यातरी शक्य नाही. परंतु सर्व स्तरांतून आलेल्या सूचना व प्रस्तावांवर विचार झाला असून लवकरच पॅकेज दिले जाईल. यापूर्वी सरकारने तीनदा पॅकेज दिली आहेत. त्यामुळे आता येणारे चौथे पॅकेज ठरणार आहे.त्यासाठी समाजातील, उद्योगजगतातील विविध घटकांकडून आलेल्या सूचना व प्रस्तावांचा विचार केला जात आहे, अशी माहिती तरुण बजाज यांनी आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींना दिली.

सध्या देशात खाद्यपदार्थांच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. मात्र ही स्थिती फार काळ राहणार नसून सरकारने खाद्यपदार्थांच्या किंमती आयोक्यात राहाव्यात, यासाठी काही उपाय योजले आहेत. देशात नवे पिक बाजारात येण्यासाठी तयार आहे. या पिकाच्या वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न होत असून पिकांच्या प्रभावी वाहतुकीमुळे उपलब्धता वाढेल, ज्यामुळे खाद्यपदार्थांच्या महागाईवर अंकुश ठेवणे शक्य होईल, असा विश्वास बजाज यांनी व्यक्त केला.


यापूर्वीची पॅकेजेस

– यावर्षी मार्च महिन्यात सरकारने १.७० लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना घोषित केली. कोविड-१९ संसर्गामुळे आर्थिक मार्ग खुंटलेल्या समाजातील गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी ही योजना आणण्यात आली.

– गरीब कल्याण योजनेपाठोपाठ २०.९७ लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत कर्ज पॅकेज सरकारने यावर्षी मे महिन्यात घोषित केले. यामध्ये मुख्यतः पुरवठ्याकडे लक्ष देण्यात आले आणि दीर्घकालीन सुधारणांचा विचार करण्यात आला.

– गेल्या महिन्यात सरकारने एलटीसीबाबत कॅश व्हाउचर योजना घोषित करून पुन्हा एकदा १२ व त्यापेक्षा अधिक टक्के जीएसटी लागणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची मागणी वाढवण्याचा प्रयत्न केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here