आरोपी बद्री चव्हाण याने २ नोव्हेंबरला त्याची पत्नी गंगाबाई हिला माशाचे कालवण करण्यास सांगितले. मात्र, सोमवार असल्यामुळे गंगाबाई यांनी माशाचे कालवण करणार नसल्याचे सांगितले. भाजी करण्यास नकार देताच बद्री चव्हाण याने गंगाबाई यांना कुक्कडवेढ येथील कॅनोलच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ नेले. तेथे गंगाबाई यांना मारहाण केली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात गंगाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा पृथ्वीराज याने पोलिसांत तक्रार दिली असून, त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times