मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. केंद्रीय नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनीही ट्विट करत ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच, भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलनं, उपोषण, मोर्चा आणि सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.

‘भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की, हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

‘आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार !’, असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here