म. टा. प्रतिनिधी, : नारेगावातील एका विभक्त विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून अशोक विधाते (रा. राजेंद्रनगर, नारेगाव) व अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणारा विधातेचा साथीदार सय्यद शकील (रा. मिसारवाडी) या दोघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, अत्याचारप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारेगावातील ३० वर्षीय विवाहिता दहा वर्षांपासून विभक्त राहते. गेल्या चार वर्षापासून ती महालपिंप्री येथे आई-वडिलांसोबत राहते. नारेगाव रोडवर तिचे कापडाचे दुकान आहे. त्यामुळे ती महालपिंप्रीहून दररोज नारेगावातील दुकानात दुचाकीने जाणे-येणे करायची. नारेगावातील तिच्या दुकानात अशोक विधाते नेहमी कपडे घेण्यासाठी येत होता. त्यावेळी त्याच्याशी विवाहितेची ओळख झाली. दरम्यान, २५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास विधातेने तिला फोन करून ‘माझे तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे. तू मला भेटायला टी.व्ही. सेंटरला ये’ असे म्हणून नातेवाईकांच्या घरी बोलावले. तेथे गेल्यावर विधातेने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण आयुष्यभर सोबत राहू. तू माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव’, असे म्हणून तिच्याशी बळजबरीने संबध ठेवले. पुढे विधाते वारंवार तिला टी.व्ही. सेंटर येथील नातेवाईकाच्या घरी बोलवून संबध ठेवू लागला. अशातच २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने फोन करून पुन्हा नातेवाईकाच्या घरी बोलावले. त्यावेळी देखील त्याने बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. त्यानंतर दोघे बोलत असताना विधातेने तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली. मात्र, विवाहितने नकार दिल्यानंतर ब्लॅकमेल करत धमकी दिली. या प्रकरणात पीडित महिलेने सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा विधातेने आपले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्याने मोबाइलमधील दोघांचे अश्लिल व्हिडिओ दाखवले. या प्रकारामुळे विवाहितेला धक्का बसला. त्यावर व्हिडिओ कधी बनवले, अशी विवाहितेने विचारणा केल्यावर त्याने बदनामीची धमकी दिली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी विधातेचा मित्र सय्यद शकील विवाहितेला नारेगावातील एका हॉटेलसमोर भेटला. त्याने ‘विधातेने जरी तुझे अश्लिल व्हिडिओ डिलिट केले. तरी ते सर्व व्हिडिओ माझ्या मोबाइलमध्ये आहेत. मी ते सर्वांना दाखवतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर विवाहितेने घडलेला प्रकार भाऊ व आईला सांगितला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here