वाचा:
अलिबाग पोलिसांनी आज सकाळी अर्णब यांना वरळीतील त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना सध्या अलिबागला नेण्यात आलं आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध केला जात आहे. राज्य सरकार सूड भावनेनं वागत असल्याची टीका होत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी अर्णब यांचं कौतुक केलं आहे.
वाचा:
‘बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा!… असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या माध्यमातून त्यांनी अर्णब यांची पाठराखण केली आहे. अर्णब गोस्वामी हे तत्वनिष्ठ आहेत. त्यामुळंच त्यांना सहन करावं लागत आहे,’ असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सोबत #DeathofDemocracy असं हॅशटॅगही त्यांनी दिलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times