मुंबई: रिपब्लिक वाहिनीचे संपादक यांना रायगड पोलिसांनी अटक करून अलिबाग येथे आणण्यात आलं आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग येथे पोहोचले होते. पण, पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारवर टीका करत भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनं आणि मोर्चा काढा असं आवाहनच भाजप कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्णब यांची भेट घेण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना बाजूला काढलं, असा आरोप केला आहे.

‘अर्णब गोस्वामी यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, पोलिस कशाप्रकारे त्यांच्याशी वागतात हे पाहण्यासाठी गेलो होतो. फक्त लांब उभं राहून पाहत होतो तरीदेखील पोलिसांनी मला बाजूला फेकलं, असं सांगतानाच त्यांनी पोलिसांच्या या वागणूकीचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे. पत्रकारांना जेलमध्ये पाठवण्याची ठाकरे सरकारनं मोहिम चालवली आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here