अलप्पुझाः केरळमधील लोकांनी पुन्हा एकदा सामाजिक भान जपले आहे. रविवारी केरळच्या अलप्पुझामधील एका मशिदीत हिंदू जोडप्याचे रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. या लग्न समारंभाला मुस्लिम आणि हिंदू समाजाचे लोक उपस्थित होते. या लग्न समारंभाचे आयोजन चेरूवली मुस्लिम जमात मशिदीने केले होते. केरळचे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलेय की, केरळ एक आहे. आणि यापुढेही एकच राहिल. मशिदीमध्ये पार पडलेल्या लग्नात मंत्रोच्चार उच्चारण्यात आले. या जोडप्याने अग्नीसमोर सात फेरे घेतले. त्यानंतर नवरदेव शरत आणि नवरी अंजू यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केले. भटजी बुवांनी विधी पार पाडत लग्न पार पाडले. यानंतर लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळीना मस्त जेवण देण्यात आले. एका मशिदीत हिंदू रितीरिवाजानुसार लग्न पार पडल्याने याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या लग्नाची माहिती होताच मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर पोस्ट करून नव जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या लग्नासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, केरळ नेहमी सर्वधर्म समभाव जपणारे राज्य आहे. देशात सध्या धर्मावरून लोकांचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत असताना केरळमध्ये अशा पद्धतीने लग्न झाले. त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. केरळ नेहमी असेच राज्य राहिले आहे. व ते नेहमी असेच राहिल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नवरी अंजू ही गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे अंजूच्या आईने मशीद कमिटीकडे मदत मागितली होती. मशीद कमिटीने पुढाकार घेऊन अंजूचे लग्न केले. इतकेच नाही तर मशिदीत लग्न लावून सामाजिक भान जपले. मशीद कमिटीने नवरीला सोन्याचे १० नाणे आणि दहा लाख रुपयेही दिले. या लग्नासाठी १ हजार लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती, असे मशीद कमिटीचे नुजुमुद्दीन यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here