पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीतील ( bihar election) तिसर्‍या आणि अखेरच्या टप्प्यात राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( ) यांनी अररियामध्ये बुधवारी प्रचारसभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) आणि बिहारमधील नितीश सरकारवर जोरदार निशाणा साधला.

ईव्हीएम म्हणजे एमव्हीएम – मोदी मतदान यंत्र. ( ) पण, यावेळी बिहारमध्ये तरुणांमध्ये रोष आहे. अशा परिस्थितीत, ईव्हीएम असो वा एमव्हीएम, यावेळी ‘महाआघाडीच’ जिंकेल आहे. आपलं हे नातं एका दिवसाचं नव्हे तर जीवनभरासाठी असायला पाहिजे. पंतप्रधान मोदी जितका द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात तितकंच मी प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करतो. द्वेष हा द्वेषाने नव्हे तर प्रेमानेच संपवता येतो, असं राहुल गांधी म्हणाले.

काळ्या पैशाविरूद्ध मोदींचा लढा होता तर मग शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार का उभे राहिले? त्यांच्याकडे काळा पैसा होता का? देशातील लाखो मजूर रोजंदारीवर जगतात, हे पंतप्रधान मोदींना ठाऊक आहे. पण लॉकडाउन घोषित करण्यापूर्वी बिहार आणि इतर राज्यातील मजुरांचे काय होईल? याचा विचार पंतप्रधान मोदींनी एक मिनिटही केला नाही.

‘एकजूट होऊन आम्ही राज्याचा विकास करू’

पंजाबमध्ये फूड प्रोसेसिंगचे कारखाने आहेत. म्हणून तेथे योग्य दर आहे. म्हणून मक्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बिहारमध्ये कारखाने उभारावे लागतील. हे सर्व कारखाने आपल्या शेताजवळ असतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर ते प्रत्येक जाती, धर्म, गरीब, मजूर आणि प्रत्येक जिल्ह्याचे सरकार असेल. आम्ही एकत्रितपणे हे राज्य बदलण्याचे कार्य करू. छत्तीसगडमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. सत्तेत आल्यावर धान खरेदीला २५०० रुपये दिले जातील, असं आश्वासन त्या निवडणुकीत आम्ही दिलं. हे सत्तेत आल्यावर आम्ही हे आश्वासन पूर्ण केलं, असं राहुल गांधी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here