वाचा:
शोहेब तांबोळी काहीही कामधंदा करत नाही. तक्रारदार तरुणी क्लासला जाताना तो सतत तिचा पाठलाग करत होता. तिला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत होता. तिने त्याला कोणताच प्रतिसाद न दिल्यावर चिडलेल्या शोहेबने तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला देखील संबधित तरुणी घाबरली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वाचा:
यामुळे एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तांबोळी याने या तरुणीचे घर गाठले. तिथे त्याने चित्रपटातील प्रेमगीत गात तरुणीला साद घातली. यालाही काहीही प्रतिसाद मिळला नाही. यामुळे तो आणखीनच चिडला. गाणी म्हणताना तो अश्लील इशारेही करत होता. या अश्लील इशाऱ्यांमुळे तक्रारदार व आजूबाजूंच्या महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. यामुळे त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच त्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times