नवी दिल्ली: फ्रान्सहून नॉन स्टॉप उड्डाण करून तीन राफेल लढाऊ विमानांची ( ) तुकडी जामनगर हवाई तळावर ( arrived in india ) पोहोचली आहे. आता गुरुवारी ही तीनही विमानं अंबाला एअरबेसवर जातील. यापूर्वी २९ जुलैला पाच राफेल विमानांचा ताफा अंबाला येथे पोहोचला. १० सप्टेंबरला या विमानांना हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. फ्रान्सकडून सुमारे ५९ हजार कोटींमध्ये अशी ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या करार भारताने केला आहे.

अतिशय किचकट मोहीम पार पाडून राफेल लढाऊ विमानं मायभूमित प्रोफेशनल आणि सुरक्षितपणे दाखल झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.

रफेल विमानांची पहिली तुकडी अंबाला येथे आणि दुसरी बंगालच्या हशिमारामध्ये तैनात असेल. पुढील दोन वर्षांत ३६ रफेल विमानांचा हवाई दलात ( ) सामवेश होईल. या विमानांच्या समावेशामुळे हवाई दलाची ताकद खूप वाढणार आहे. खासकरून चीनशी जो तणाव सुरू आहे यापार्श्वभूमीवर राफेलमुळे लडाखमध्ये भारताची ताकद वाढत आहे. या लढाऊ विमानात मेट्योर, स्कल्प, माइका यासारख्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे हे विमान अतिशय संहारक बनले आहे. जे शत्रूला हवेतून हवेत आणि जमिनीवरही ठार मारू शकते. इतकेच नाही तर हे विमान एकाच वेळी बर्‍याच मोहिमा पार पाडू शकते. यामुळे त्याचा इतरांवर दबदबा राहतो.

राफेल विमानांचा योग्य वेळी हवाई दलात समावेश झाला, असं हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस. भदौरिया म्हणाले. सध्याची सुरक्षा परिस्थिती पाहता राफेल विमानं हवाई दलात समावेश करण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. अंबाला येथे राफेलचा सैन्यात समावेश होणं महत्त्वाचं आहे. कारण हवाई दलाचा या तळावरून सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात सहज जाता येऊ शकते, असं भदौरिया म्हणाले होते.

एका कार्यक्रमात राफेल विमानांचा हवाई दलात औपचारिक समावेश करण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले या देखील उपस्थित होत्या. राफेल विमानांना हवाई दलाच्या १७ व्या पथकात स्क्वॉड्रनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पारंपरिकपणे सलामी देऊन त्यांचा हवाई दलात समावेश झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here