मुंबई: बँकेने व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाशी संबंधित घोटाळ्यात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ , त्यांचे पती तसेच माजी खासदार वेणुगोपाळ धूत यांचेही या आरोपपत्रात नाव आहे. ( Latest News Updates )

वाचा:

दीपक कोचर हे कपनीची उपकंपनी असलेल्या नू पॉवर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करीत बँकेद्वारे नू पॉवर कंपनीला तब्बल १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. ते कर्ज पुढे बुडित खात्यात गेले. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २०१७ ते २०१८ डिसेंबरदरम्यान चौकशी केली होती.

वाचा:

ईडीतील सूत्रांनुसार, दीपक कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर केल्याचा संशय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉन्डरिंग झाले आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. याच प्रकरणात दीपक यांचे बंधू राजीव कोचर यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्याखेरीज नू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उप कंपनी आहे. त्यामुळेच व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाळ धूत यांचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here