सांगली: पोट साफ न होण्याच्या तक्रारीनंतर शस्त्रक्रिया करूनही बाळाला त्रास होत असल्याच्या नैराश्यातून त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची कबुली जन्मदात्या आईने दिली. हा प्रकार बुधवारी (ता. ४) सकाळी तालुक्यातील माळवाडी येथे घडला. अज्ञात व्यक्तीने अपहरण करून बाळाला पाण्याच्या टाकीत टाकल्याचा बनाव तिने केला होता. पोलिसांच्या तपासात तीन तासात हा बनाव उघडकीस आला. ( Latest Updates )

वाचा:

माळवाडी-वसगडे रस्त्यालगत फिर्यादी यांचा साईदीप नावाचा बंगला आहे. बुधवारी सकाळी त्यांची मुलगी ही तेरा दिवसांच्या बाळासोबत बेडरूममध्ये होती. बाळाला पोट साफ न होण्याचा त्रास होता. यामुळे त्याच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून विष्टा बाहेर पडण्यासाठी नळी बसवली होती. मात्र, याचा त्रास होत असल्याने ते वारंवार रडत होते. यामुळे ऐश्वर्या निराश होती. सकाळी आई आणि वहिनी या दोघी शेतातील हौदावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. इतर नातेवाईक शेतात गेले होते. यावेळी ऐश्वर्याने तिच्या बाळाला गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवले. यानंतर तिने अज्ञाताने घरातून बाळ पळवल्याचा बनाव केला. नातेवाईकांनी शोध घेतला असता, गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बाळाचा मृतदेह आढळला. या प्रकाराने खळबळ उडाली होती.

वाचा:

ऐश्वर्याचे वडील उत्तम धोंडीराम माळी यांनी भिलवडी पोलिसात वर्दी देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माळी कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. बाहेरची व्यक्ती घरात आली नसल्याने घरातीलच कोणीतरी बाळाचा खून केल्याचा संशय बळावला व पोलिसांनी ऐश्वर्याकडे अधिक चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here