पुंडलिक नगर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या विशाल नगरात तोफिक जमीर पठाण व मुलगी दोघेही शेजारी शेजारी राहतात तोफिक हा बीए शिकलेला असून मुलगी चे बीकॉम चे शिक्षण सुरू आहे दोघांची गेल्या तीन वर्षापासून एकमेकांसोबत ओळख होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र लग्नाला विरोध होईल म्हणून दोघे २६ ऑक्टोंबर पासून दोघेही बेपत्ता होते. त्यांना बुधवारी ( ४ नोव्हेंबर ) एमायडीसी वाळूज परिसरातून पोलिसांनी शोधून आणले दोघांचे जबाब नोंदवत असताना मुलीची समजूत काढल्यानंतर ही आई कडे जाण्यास तयार झाली होती ही बाब लक्षात येताच तोफिक याने जबाब नोंद असलेल्या खोलीतून बाहेर पळत जाऊन खाली उडी मारली. या तो गंभीर जखमी झाला त्यास पोलिसांनी व नातेवाईकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवले. प्रथम उपचार केल्यानंतर त्यास घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times