गेल्या दोन महिन्याच्या काळात शहरात चार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई झालेल्या आहेत. या कारवाई लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी लाच प्रकरणात चौथी कारवाई होती. ही कारवाई झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी या कारवाईसाठी संबंधीत पोलिस ठाण्याचे निरिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. संबंधीत अधिकारी पोलिस ठाण्यात दफ्तर तपासणी निट करित नाहीत. डॉ. गुप्ता यांनी शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त हे ही नियमित पणे पोलिस ठाण्याला भेट देण्याची सुचना केली. भेटी दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी चिकीत्सक पदधतीने पाहणी करावी. संशयीत पोलिस कर्मचाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करावी. संशयास्पद पोलिस कर्मचाऱ्यांकडे गुन्ह्यांचा तपास देण्यात येऊ नये. तसेच पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या तक्रारी किंवा फिर्यादींचा आढावा घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.
बुधवारी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर एकही लाचेचे प्रकरण शहर पोलिस विभागात आढळल्यास संबंधीत पोलिस निरिक्षकाला जबाबदार धरून त्याची बदली करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील. याशिवाय अशा प्रकरणात संबंधीत ठाणे प्रमुखांना कारणे दाखवा नोटीसही बजाविण्याचा आदेश डॉ. गुप्ता यांनी दिला.
उपायुक्तांनीही तपासणी करावी
लाचेच्या प्रकरणात पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी फक्त पोलिस निरिक्षक किंवा सहाय्यक पोलिस निरिक्षकांसह ठाणे प्रमुखांना बजावले असे नाही. तर त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणुन कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही नियमित तपासणी करून आलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्या प्रकरणातील प्रगती तपासणी घ्यावी असे आदेश दिले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times