तालुक्यातील परिसरातील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाच्या हादऱ्याने पडझड होऊन एका महिलेचा मृत्यू आहे, तर चार सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत.

आर्कोस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जसनोव्हा कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की दोन ते तीन किलोमीटरच्या परिसराला हादरे बसले. या हादऱ्याने शेजारच्या कंपन्यांचे छत कोसळून त्यात एका सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे.

स्फोटात जसनोव्हा कंपनीबरोबरच एसएस पेपर ट्यूब, पेन ट्यूब या कंपन्यांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आसपासच्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here