अमेठी: ज्या पित्याला आपल्या अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकल्याला बेवारसा सोडण्याची पाळी येत असेल तर त्याची असहायता किती असेल याची कल्पना केलेली बरी. कोणालाही आपल्या काळजाच्या तुकड्याला असे स्वत:पासून वेगळे करणे सोपे नाही. काळजावर दगड ठेवून असे करावे लागते. एका पिता असहाय होता, परिस्थितीपुढे हारलेला होता. त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता. अखेर या पित्याने आपल्या चिमुकल्याला एका बॅगेत पॅक केले. काही पैसे ठेवले आणि एक लिहिले. मी पैसे पाठवत राहीन, काही महिन्यांसाठी माझ्या मुलाचा सांभाळ करा. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

अमेठी पोलिसांनी एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याला झोले येथून ताब्यात घेतले. मुंशीगंज भागातील त्रिलोकपूर परिसरात पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले. बॅगेतून रडण्याचा आवाज आल्यानंतर पीआरव्हीला याबाबतची माहिती दिली. या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मुलाला ताब्यात घेतले. खरे तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या हेल्पलाइन ११२ वर बुधवारी एक मुलगा बॅगेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसाचे एक पथक मुंशीगंज क्षेत्रातील त्रिलोकपूर भागात राहणाऱ्या आनंद ओझा यांच्या निवासस्थानी पाहोचले.

एका बॅगेत मुलाचा आवाज ऐकू आल्यानंतर लोकांनी कंट्रोलरुमला फोन केला. त्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले. पोलिसांनी बॅग उघडल्यानंतर त्यात एक मूल, कपडे, बूट, ५ हजार रुपये आणि इतर गरजेच्या वस्तू निघाल्या. तसेच बॅगेत एक चिठ्ठी देखील होती. ही चिठ्ठी कथित स्वरुपात मुलाच्या पित्याने लिहिली आहे.

‘माझ्या कुटुंबात याला धोका आहे… आणखी पैसे हवे असल्यास कळवणे’
या चिमुकल्याच्या पित्याने पत्रात लिहिले, ‘हा माझा मुलगा आहे, याला मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. यामुळे मी माझ्या मुलाला तुमच्याजवळ सोडत आहे. मी दरमहा ५००० रुपये पाठवत जाईन. मी आपणास हात जोडून विनंती करतो की, कृपा करून त्याचा सांभाळ करा. माझी काही असहायता आहे, या मुलाची आई नाही आहे. माझ्या कुटुंबात मुलाला धोका आहे, म्हणून याला तु्म्ही तुमच्याकडे सहा- सात महिन्यांसाठी ठेवा. सर्व काही व्यवस्थित करून मी तुम्हाला भेटेन आणि मुलाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा.’

क्लिक करा आणि वाचा-

मुलाला सोडणाऱ्याचा आणि कुटुंबीयांचा शोध घेत आहेत पोलिस

या मुलाला देखरेखीसाठी ज्याने फोन केला त्याच्याकडेच ठेवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या व्यतिरिक्त हा मुलगा कोणाचा आहे, त्याला येथे कोणी सोडले, तसेच बॅगेतील पत्राचे सत्य काय आहे, या गोष्टींचा तपास आता पोलिस करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here