नवी दिल्लीः चीनची राजधानी बीजिंग पासून पाकिस्तानचे सर्व शहरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेली स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज भारताकडून करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे. या चाचणीनंतर भारतीय लष्कर पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के-४ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ही एक आहे. के-४ शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-५ आहे. याची डागण्याची क्षमता जवळपास ७०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. देशात बनवलेली अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. भारताकडे आयएनएस अरिहंत परमाणू पानबुडी आहे. तर अन्य एका पानबुडीचा समावेश करण्यात येणार आहे. जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.

ची वैशिष्ट्ये

३५०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकते
१२ मीटर क्षेपणास्त्राची लांबी आहे
१.३ मीटर गोल आकार आहे
तब्बल १७ टन वजन आहे
२००० किलोचे शस्त्र घेऊन जाण्याची क्षमता
२० मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here