म. टा. प्रतिनिधी, : महिलेचा करून त्रास देणाऱ्या तरुणाच्या विरोधात पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच तरुणाने महिलेच्या फेसबुक व इन्स्टाग्रामचे पासवर्ड चोरून त्याद्वारे तिच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून त्रास दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ऋषीकेश नितीन पवार (२९, रा. शिवाजीनगर गावठाण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या आरोपीला ओळखतात. जानेवारी महिन्यापासून आरोपी तक्रारदार महिलेचा पाठलाग करून त्रास देत होता. प्रत्यक्ष भेटून व फोनवर बोलण्याचा आग्रहही धरत होता. फोन न उचलल्यास आयुष्य उद्ध्वस्त करण्याची; तसेच त्यांच्या नवऱ्याची बदनामी करण्याचीही धमकी आरोपीने दिली होती. आरोपीने महिलेच्या फेसबुक व इन्स्टाग्रामचे पासवर्ड चोरून, बनावट अकाउंट उघडून त्यावरून महिलेच्या मित्रमैत्रिणींनी व्हिडीओ कॉल करून त्रास दिला.

या सर्व प्रकाराला तक्रारदार खूपच वैतागल्या होत्या. अखेर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंग व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

खरेदीच्या बहाण्याने सोन्याची चोरी

पिंपरी: सोन्याच्या चमक्या खरेदी करण्यासाठी आलेल्या अनोळखी महिलेने सराफी पेढीतून एक लाख ९ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या चमक्या चोरून नेल्या. रविवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी आनंदनगर, जुनी सांगवी येथे ही घटना घडली. सुधीर रघुनाथ तरटे (वय ३०, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील कावेडिया ज्वेलर्स या दुकानात अंदाजे ४५ वर्षे वयाची महिला ग्राहक म्हणून रविवारी दुपारी एकच्या सुमारास आली होती. तिने सोन्याच्या चमक्या खरेदी करण्याचा बहाणा केला. त्या वेळी ग्राहक महिलेने ४३ ग्रॅम ८०० मिली वजनाच्या एक लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्यांची तीन पाकिटे चोरून नेली. रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here