अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील, अशी टीका शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या या टीकेचा आशिष शेलार यांनीही समाचार घेतला आहे.
‘त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांनी खोटे ठरवून आता एका ‘सिंह’ यांना ‘परमवीर’ का देताय? असा सवाल करत खरी नौटंकी तर हीच आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय, एका युवराजाला वाचवण्यासाठी महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?,’ असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखावर हल्लाबोल चढवला आहे.
‘रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा. अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन दिशा सालीयनबाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी….,’असा इशाराच शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times