या वेळी शोमध्ये क्रिकेट आणि विनोदाचा तडका एकाचवेळी पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यावेळी पत्नी प्रियांका रैनासोबत शोमध्ये आला. यावेळी दोघांनी खासगी आयुष्यातील अनेक मजेशीर प्रसंगही शेअर केले.
नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला. यात सुरेशने त्याला क्रिकेट शिकवणाऱ्या प्रशिक्षकांचीच प्रियांका मुलगी असल्याचं सांगितलं. प्रियांका आणि सुरेश एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याचंही दोघांनी सांगितलं. असं असलं तरी सुरेश आणि प्रियांका आठ वर्ष एकमेकांना भेटले नव्हते. प्रियांका परदेशात नोकरी करत होती तर सुरेशही त्याच्या करिअरमध्ये व्यग्र होता.
दरम्यान कपिल आणि सुरेश एकमेकांसोबत मुलांबद्दलच्याही गप्पा मारल्या. यावेळी कपिल म्हणाला की, मुलीच्या जन्मानंतर त्याने पत्नी गिन्नीचा अधिक आदर करण्यास सुरुवात केली आहे. कारण एका आईला बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो.
याचवेळी एक किस्सा शेअर करताना कपिलने सांगितलं की त्याची आई कपिलवर फार रागावली होती. कपिल म्हणाला, ‘मी गिन्नीला म्हणालो की, मुलीच्या जन्मानंतर तुझ्यासाठीचा आदर अजून वाढला आहे. मी हे सांगत असताना, माझी आई तिथेच बसली होती. माझं बोलणं ऐकल्यावर आई म्हणाली की, मी तीन मुलांना जन्म दिला. माझ्याबद्दल तुला असं कधी जाणवलं नाही.’ आईचा हा किस्सा ऐकल्यावर स्टेजवर सर्वांनाच हसू फुटलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times