बेंगळुरूः भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने कांगारूंना जोरदार दणका देत शानदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या रोहित शर्माने संयमी खेळ करत क्रिकेटमधील आपले २९ शतक पूर्ण केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता न आलेल्या रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ११० चेंडूत आपले शतक साजरे केले. रोहितच्या या खेळीत ८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे रोहितचे हे ८ वे शतक आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळवणारा चौथा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला रोहितने मागे टाकले असून, जयसूर्याच्या नावावर २८ शतके आहेत.

शतक साजरे करण्यापूर्वी रोहित शर्माने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा रोहित शर्माने पूर्ण केला आहे. सर्वात जलद ९ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला असून, पहिल्या स्थानावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने १९४ डावात ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहितला हा टप्पा ओलांडण्यासाठी २१७ डाव खेळावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here