मुंबईः संपादक यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते कमालीचे सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारविरोधात दावा केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणी रायगडच्या मुख्य न्याय दंडधिकाऱ्यांनी दिलेल्या निवाड्यातील मुद्दे त्यांनी मांडले आहेत.

आशिष शेलार यांनी ट्विट करत अर्णब गोस्वामी यांची अटक ही सूडबुद्धीनं केली असल्याचा दावा याआधीही केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी ट्विट करत न्यायालयाचे मुद्दे मांडले आहेत. ‘२०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावे आलेला नाही त्यामुळं अ समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला आहे. पोलीस कोठडीचे समर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही. शिवाय, पोलिसांनी मोघमपणे तपास करता येणार नाही,’ असंही शेलार यांनी नमूद केलं आहे. आशिष शेलार यांनी हे तीन मुद्दे मांडले आहेत.

‘सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुद्धीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला आहे. आता न्यायालयच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर?’ असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केलाय. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’, असा युक्तिवाद गोस्वामींसाठी त्यांच्या वकिलांनी मांडला. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं जामिनावरील सुटकेविषयी उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here