मुंबईः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्या प्रस्तावार अद्याप रेल्वेकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाहीये. यावरून महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्राला यामध्ये राजकारण करायचं आहे म्हणूनच लोकल सुरु करण्यास टाळाटाळा करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी लोकल का सुरु होत नाही या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रावर आरोप केला आहे. मुंबई लोकलबाबत राजकारण करण्यात येत आहे. आम्ही आतापर्यंत चार पत्र रेल्वेला लिहली आहेत. त्यानंतर रेल्वेकडून आम्हाला एकच पत्र आलं आहे त्यालाही आम्ही उत्तर दिलं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

लोकल सुरु झाल्यानंतर पोलीस आणि सुरक्ष रक्षत तैनात करणार असल्याचंही आम्ही रेल्वेला कळवलं आहे. त्याचबरोबर प्रवाशांना कोणत्या रंगाचे पास द्यायचे, त्यांचा प्रवासाची वेळ काय असेल, तिकीट ऑनलाइन द्यायचे की कसे द्यायचे? याबाबतही रेल्वेला कळवली आहे. चार पानी पत्र लिहून आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिली. पण तरीही त्यांनी लोकल सुरु केल्यानंतर गर्दी उसळल्यास काय करणार? असा सवाल त्यांनी केला. खरं तर त्यानाही लोकल सुरु करायची आहे. पण फक्त क्रेडिट मिळावं म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून पैसे मिळणार
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवानगी मिळेल. सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here