गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रसार आता कमी होताना दिसतोय. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात करोनानं थैमान घातलं होतं. आता करोनाचं संकट हळहळू दूर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांचा आकडा खाली येत आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवाळीच्या तोंडावर हा सर्वसामान्यांसाठी दिलासा असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, दिवाळीच्या काळात नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा धोका वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ञांकडून सांगितलं जातं.
आज करोना रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज तब्बल ११ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ९१. ०७ टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२ लाख ५० हजार ७५८ चाचण्यांपैकी १७ लाख ०३ हजार ४४४ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात १२ लाख ५२ हजार ७५८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, १२ हजार ००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times