‘सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने सुचवलेल्या प्रस्तावावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपला लेखी अभिप्राय त्याचदिवशी दिला आहे. तसंच, २८ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने पाठवलेल्या पत्राला रेल्वेनं योग्य ती माहिती दिली होती. लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकर व्हावी. यात गर्दीचे नियोजन करण्याच्या संदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा असेही रेल्वेनं पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. पण राज्य सरकारने अद्यापही त्यावर उत्तर दिलं नसल्याचं, मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, याबाबतीत लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे, असंही मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.
सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या दृष्टीनं रेल्वेकडून तयारीही करण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टनसिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेच्या एकूण क्षमतेच्या ८८ टक्के गाड्या सुरु केल्या आहेत, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
टप्याटप्यानं लोकलसेवा सुरू
लॉकडाऊननंतर जनसामान्यांसाठी बंद असलेली उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवा आणि इतर क्षेत्रातील प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने महिलांसाठी ही लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी रेल्वेला विनंती केली होती. सकाळी गर्दीची वेळ वगळता आणि क्यूआर कोड पासशिवाय आता महिलांना स्थानकात प्रवेश करून प्रवास सुरू करता येईल, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर रेल्वेनं सर्वांसाठी सुरु व्हावी यासाठी रेल्वे सरकारला प्रस्ताव पाठवला होता. यावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपला लेखी अभिप्राय दिला असून आम्ही सर्वासांठी लोकल सेवा सुरु करण्यास सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times