पिंपरी चिंचवड: घातला नाही, याची विचारणा केली म्हणून वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्यात आली आणि बोनेटवर घेऊन या पोलिसाला १ किलोमिटर फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.
चालकाने मास्क न घातल्याने पोलिसाने एक कार थांबवण्याचा इशारा केला. कारचालक थांबत नसल्याने प्रयत्न करत होता मात्र चालकाने कार तशीच पुढे नेली. या प्रकारात पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटेवरून बरेच अंतर पुढे फरफटत नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times