कोल्हापूर: ते दोघे काही काळ निवांत गप्पा मारत होते, थोड्या वेळाने त्यांच्यात वाद सुरू झाला, वाद वाढत गेला आणि प्रेयसीने पुलावरून थेट नदीत उडी मारली, गोंधळलेल्या प्रियकराने तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी ही घटना पाहून त्यांना मदतीचा हात दिला आणि प्रियकर व प्रेयसी दोघेही बचावले. ( Kolhapur Latest News Updates )

वाचा:

ही घटना आहे येथील पंचगंगा नदीच्या शिवाजी पूलावरील. तालुक्यातील एक युवक औद्योगिक वसाहत येथे काम करतो. गोकुळ शिरगाव येथील एका युवतीबरोबर त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे. दुपारी दोघेही दुचाकीवरून पन्हाळ्याला निघाले होते. वाटेत शिवाजी पुलावर थांबून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. काही वेळातच या गप्पांचे रूपांतर वादात झाले. हळूहळू वाद वाढत गेला. यातून चिडलेल्या प्रेयसीने थेट नदीत उडी मारली.

वाचा:

प्रेयसीने अचानक नदीत उडी मारल्याने प्रियकर घाबरला. काय करावे हेच त्याला कळेना. शेवटी धाडस करत त्यानेही नदीत उडी मारली. युवक आणि युवतीला नदीत उडी मारताना पाहून रस्त्यावरून येजा करणारेही हादरले. त्याचवेळी तेथे संदीप निळपकर हा पोलीस कर्मचारीही तेथे होता. त्यांना वाचवण्यासाठी नदीच्या दिशेने तो धावत सुटला. पण तोल जाऊन पडल्याने तो जखमी झाला. तोवर आजूबाजूचे अनेक लोक तेथे गोळा झाले होते. प्रियकराने तिला ओढत काठावर आणले. दोघांनाही लोकांनी वाचवले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर नातेवाईकांकडे सोपवले. पण पंधरा ते वीस मिनिटे पुलावर जो थरार झाला, त्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here