नगर: लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यासंबंधी काँग्रेसचे आमदार यांनी यापूर्वी वेळोवेळी विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्या यथावकाश पूर्णही झाल्या. आता त्याही पुढे जात संपूर्ण लॉकाडाऊन उठवण्याचीच मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ( MLA On )

वाचा:

शिथील केले जाऊ लागले असताना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील नेतेही विविध मागण्या करत आहेत. त्यामध्ये रोहित पवारही आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील लोक पवार यांना भेटून लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडत आहेत. त्यातील काही मागण्या पवार सोशल मीडियातून अगर संबंधित मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मांडत आहेत.

सरकारने सिनेमागृह, नाट्यगृह, योगा, जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय आता लागू केला. ही मागणीही पवार यांनी केली होती. ती आता पूर्ण होत असताना पवार यांनी नवी मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सिनेमागृह व नाट्यगृह सुरु झाल्यानंतर आता संपूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात यावा. मात्र, त्यासोबतच नागरिकांनी देखील कायदा-सुव्यवस्थेचं पालन करावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर करत स्वतःची काळजी घ्यावी.’

वाचा:

मधल्या काळात व अन्य विरोधकांनी मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, यासंबंधी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या मागणीसंबंधीही पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, विरोधक एकच मागणी जोरदारपणे लावून धरत असल्याचे पाहून पवार यांनी अन्य मागण्याही वेळोवेळी केल्या. त्यातील अनेक मार्गी लागल्या. आपल्याच सरकारकडे जाहीरपणे मागण्या करीत असल्याने सुरुवातीला पवार यांच्याविरूद्ध सोशल मीडियातून टीकाही झाली होती. मात्र, पवार यांनी याकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवले. अधूनमधून नवीन मागण्या आणि प्रस्ताव ते सूचवत राहिले. विशेष म्हणजे मागण्यांसंबंधीही त्यांनी टायमिंग साधल्याचेही दिसून येते.

वाचा:

आता जवळपास सर्वच व्यवहार सुरू होत आहेत. शिल्लक असलेल्या प्रमुख मागण्यांपैकी धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व काही खुले करतानाच धार्मिकस्थळेही सुरू करून निर्णय घेतानाही विरोधकांच्या मागणीतील हवा काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता संपूर्ण लॉकडाऊनच उठविण्याची मागणी पुढे करण्यात येत असल्याचे दिसून येते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here