मुंबई: सध्या राज्यात संसर्गाचे १ लाख ६ हजार ५१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत मात्र, युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहता आपण अधिक काळजी घेतल्यास व नियम पाळल्यास करोनाची लाट रोखू शकू, असे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्री यांनी केले आहे. ( Maharashtra Chief Minister On second wave of )

वाचा:

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा आढावा घेण्यात आला व पुढील उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या मोहिमेमुळे करोनाचे ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले व त्याचवेळी आयएलआय आणि सारीचे ३ लाख ५७ हजार रुग्ण देखील आढळले, असे नमूद करत मुख्यमंत्र्यानी या मोहिमेची उपयुक्तता अधोरेखित केली. गेल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल खूप मोठी घट झाली आहे, असेही मुख्यमत्र्यांनी नमूद केले.

वाचा:

कोविडच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने घेतलेले अन्य निर्णय

आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणार

च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार प्रथम टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून १ एप्रिल २०२१ पासून वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून औद्योगिक दराने कर / शुल्क आकारणी करण्याकरिता निकष विहित करण्याकरिता एक तज्ज्ञ समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील. त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवून निकषांची पूर्तता करण्याऱ्या हॉटेल व्यावसायिकांना औद्योगिक दराने कर / शुल्क आकारणी लागू करण्यात येणार आहे.

वाचा:

मुंबई पालिकेचा भांडवली मुल्य सुधारणा करण्याचा कालावधी वाढविला

कोविडमुळे टाळेबंदी आणि इतर क्षेत्रावर विपरित परिणाम झालेला पाहता २०२०-२०२१ मध्ये सुधारित होणारे इमारत किंवा जमिनीचे भांडवली मूल्य आता २०२१-२०२२ मध्ये सुधारित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्याअनुषंगाने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये पोटकलम १५४ (१ड) अंर्तभूत करण्याकरिता अध्यादेशात तशी सुधारणा करण्यात येणार आहे. लोकांचे दैनंदिन रोजगार बंद झाल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

नवीन महाविद्यालयास परवानगी देण्याची मुदत वाढविली

करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता नवीन महाविद्यालय, नवीन पाठ्यक्रम, विषय, तुकडी सुरू करण्यासाठी असलेली मुदत सुमारे दोन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याअनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात आवश्यक तो बदल करण्यात येईल.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here