नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली. आणखी तीन राफेल विमानं मिळाल्याने भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. आधीच शक्तिशाली असलेले हे विमान आता अधिक सामर्थ्यवान होणार आहेत. कारण आता ते हॅमर क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील. हॅमर म्हणजे (Highly Agile Modular Munition Extended Range) हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र किट आहे.

फ्रान्सने भारताला देण्यात येणारी राफेल लढाऊ विमानं हॅमरने सुसज्ज करण्यास सहमती दिली आहे. रफेल हे अत्याधुनिक विमान असून आधीच ते MICA, Meteor आणि SCALP क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. पण आता हॅमर क्षेपणास्त्राने सज्ज झाल्यानंतर राफेलची ताकद आणखी वाढणार आहे. हॅमर हे अतिशय संहारक शस्त्र आहे. जे जीपीएस शिवाय अगदी कमी अंतरावरुन ७० किलोमीटरच्या लांब पल्ल्यावरून सोडता येऊ शकते.

भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये

सप्टेंबर २०२० मध्ये भारत आणि फ्रान्स सरकार यांच्यात हॅमरसाठीच्या करार स्वाक्षरी झाली होती आणि या महिन्याच्या अखेरीस अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रनला मोठ्या प्रमाणात ही शस्त्रे दिली जातील. भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण सहकार्य करारनुसार हॅमर क्षेपणास्त्र मिळण्यासाठी भारताला एक वर्षाचा कालावधी लागला असता. पण भारताची तातडीची गरज भागवण्याची तयारी फ्रान्सच्या हवाई दलाने दर्शवली आहे.

हॅमरचा शस्त्राचा कसा फायदा होईल?

हॅमर शस्त्राने अनेक लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ला करता येतो आणि विशेष म्हणजे त्याची देखभालीवरील खर्चही कमी आहे. डेटा लिंक क्षमतेसह, हॅमर शस्त्र हे युद्धासारख्या वातावरणाषीही सजग आहे आणि लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. राफेल ही हवाई दलाच्या आघाडीवरील विमानं आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही विमानं तैनात असून हाय अलर्टवर आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here