दिवाळीत राजकीय फटाक्यांची आतषबाजी करण्याचा काँग्रेसचा इरादा असून, राष्ट्रवादीमध्ये भाजपसह अन्य लहान पक्षसंघटनांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरूच राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने दिली आहे. जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, तसे झाल्यास गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे ते पाचवे माजी आमदार ठरतील, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
खान्देशातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ते राजकारणात आणखी आक्रमक होऊन दिवाळीत मोठे राजकीय फटाके फोडण्याच्या तयारीत आहेत. खडसे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याचे माजी आ. उदयसिंह पाडवी, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष व माजी आ. सीताराम घनदाट, चिपळूणचे माजी आ. रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेत माजी मंत्री भास्करराव जाधव गेल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी माजी आ. रमेश कदम हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी आठ महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तर, एकनाथ खडसे यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जोमाने करण्याचा संकल्प केल्यामुळे ते खान्देश, उत्तर महाराष्ट्रात आगामी काळात काय खेळी करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times