म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांच्याबाजूने बुधवारी दिल्लीतील भाजपनेते समाज माध्यमांवर आक्रमक झाले होते. वास्तविक सुशांतसिंह प्रकरण बिहार निवडणुकीत गाजणार, असा अनेकांचा कयास होता. मात्र तसे होत नाही, असे लक्षात आल्यावर यातील हवा निघून गेली. या प्रकरणाबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या गोस्वामी यांच्याबाबत या प्रकरणावरून भाजपकडून होणारा कौतुकाचा ओघ त्यामुळेच थांबला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिसांनी ज्या पद्धतीने अटक केली, ती पद्धत आणीबाणीच्या काळाची आठवण करून देणारी होती, अशा प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिल्या.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख अर्णव यांनी केला होता. ही आत्महत्या नाही, तर हत्या आहे, असे त्यांनी त्यांच्या चॅनेलवरून थेट सांगितले. हे प्रकरण बिहार निवडणुकीत रंग भरेल, असे तेव्हा अनेकांना वाटत होते. त्यातूनच भाजपसमर्थक असलेल्या सोशल मीडियावरील अनेकांनी या प्रकरणाला हवा दिल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत होते. त्याच दरम्यान, या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून काढून बिहार पोलिसांमार्फत सीबीआयकडे दिली. परंतु अनेक महिने उलटले, तरी अद्याप या प्रकरणातून काहीही निष्पन्न झालेले नाही. नंतर या प्रकरणातील हवा निघू लागली. लोकांनी याकडे पाठ फिरविली. हे लक्षात आल्यावर भाजपचे नेतेही या प्रकरणाचा उल्लेख टाळू लागले. याच दरम्यान, टीआरपी घोटाळ्यातही अर्णव यांच्या वाहिनीचा संबंध असल्याचा पोलिसांनी आरोप केला आणि भाजपच्या नेत्यांनी मिठाची गुळणी धरली.

गोस्वामी यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये आरोप होऊ लागल्यामुळे नेत्यांचा सूर नरम पडू लागला. सुरुवातीला केंद्र आणि राज्यातील भाजपचे नेते हे अर्णव यांचे चाहते होते. परंतु संबंधित वाहिनीवर सुरू असलेल्या गदारोळातून राजकीय फायदा दृष्टिपथात नाही, असे लक्षात येताच, अर्णव यांच्यापासून अंतर ठेवण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here