म. टा. विशेष प्रतिनिधी । मुंबई

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्य सरकारवर आरोप केल्यामुळे आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांना नेतृत्वाने रोखून ठेवले होते. राज्याचा कारभार असताना विनाकारण कायदा-सुव्यवस्था हातात घेणे योग्य नाही. कायद्याने लढाई लढायला हवी अशी समजूतही काढली. बुधवारी मात्र रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक झाल्यानंतर शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले.

वाचा:

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात त्याने आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा कांगावा समाज माध्यमातून सुरू झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी हवा दिल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले. मुंबई पोलिसांच्या तपासात आणि शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरीही या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, मात्र बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तर मुंबई पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यात रिपब्लिकन टीव्हीने रोजच्या रोज या प्रकरणात सनसनाटी आरोप करायला सुरूवात करत शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले. एका युवा मंत्र्याचा यात हात असल्याचा आरोप केल्यामुळे तर आणखीनच खळबळ निर्माण झाली. विशेष म्हणजे आरोप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र या प्रकरणात ‘मातोश्री’ला विचारल्याशिवाय कोणीही काहीच करायचे नाही, असा आदेशच शिवसेना नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे कळते.

वाचा:

राज्याच्या सूत्रेच शिवसेनेच्या हातात असल्याने विनाकारण कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशी कोणतीही गोष्ट चुकूनही होता कामा नये, याची ताकीद देण्यात आली होती. त्याच काळात अभिनेत्री कडूनही शिवसेनेवर आरोप सुरू होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन कंगनाच्या विरोधात निषेध नोंदवला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खासगीत नाराजीही व्यक्त केल्याचे कळते. उघडपणे गोस्वामी यांच्याविरोधात काहीही केले जात नसले तरी पडद्यामागून मात्र त्याच्या अलिबागमधील गुन्ह्यात बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू होते.

आत्महत्या करणाऱ्या नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामीचे नाव लिहिलेले होते, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. मात्र या प्रकरणातील सर्व खाचखळगे शोधून काढण्यात आले. अन्वय नाईक कुटुंबियांना सोबत घेऊन या प्रकरणाचा हुतात्मा चौकात निषेधही नोंदवण्यात आला. टीआरपी केसमध्ये काही तरी कारवाई होईल, याची गोस्वामी यांना कुणकुण होती. मात्र, अन्वय नाईक प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करत बुधवारी अटकच करण्यात आली.

संतापाला लगाम

गोस्वामी यांच्या बेलगाम आरोपांनंतर त्यांचा स्टुडिओ फोडण्यापासून ते त्यांच्या तोंडाला काळे पुसण्यापर्यंतची रणनीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आखण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांचा त्याला ठाम विरोध होता. राज्यात सत्ता असतानाही आपण हातावर हात धरून का बसलो आहोत, अशी विचारणा आणि पदाधिकारी करत होते. मात्र बुधवारी गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे न थकता कौतुक करताना दिसत होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here