महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या सात नोटिसांना उत्तर न देणाऱ्या वृत्तवाहिनीचे संपादक यांच्याविरोधात दुसरा हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या अवमानना प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेनेचे विधानसभा सदस्य यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना मांडली होती.
या हक्कभंग सूचनेसंदर्भात गुरुवारी विधानभवनात विशेषाधिकार समितीची बैठक झाली. त्यात विशेषाधिकार समितीचे अध्यक्षांसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपली बाजू मांडली. अर्णव गोस्वामी यांना विधिमंडळाने दिलेली नोटीस ही गोपनीय स्वरूपाची असताना अर्णब गोस्वामी यांनी ते पत्र न्यायालयासमोर सादर केले. हा प्रकार सुद्धा हक्कभंग करणारा असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर हे विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचे हनन असल्यामुळे दुसरा हक्कभंग गोस्वामी यांच्या विरोधात मांडला जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times