म. टा. खास प्रतिनिधी, : मालाडच्या एका खासगी रुग्णालयात महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुरार पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून छेड काढणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

मालाडमधील खासगी रुग्णालयात एका महिलेवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास या रुग्णालयाचा २१ वर्षीय सुरक्षारक्षक या महिलेच्या खोलीत शिरला आणि त्याने तिचा हात पकडला. पुढे काही करण्याआधीच महिलेने मदतीसाठी जवळच असलेली बेल वाजवली आणि आरडाओरडही केली. तिचा आवाज ऐकून रुग्णालयातील अन्य कर्मचारी धावत तिच्या खोलीत आले. त्यांनी सुरक्षारक्षकाला पकडले आणि कुरार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here