अहमदनगर: अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यायवरण मंत्री यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या काही घटकांचे नुकसान होणार असले तरी पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असे तांबे यांनी म्हटले आहे. ( demands ban on )

दिवाळी जवळ आल्याने सध्या फटक्यांवरील बंदीची चर्चा सुरू आहे. दरवर्षीची फटाक्यांवरील बंदीची अशीच चर्चा होते. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर ती जोरकसपणे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यानंतर आता तांबे यांनी थेट बंदीचीच मागणी केली आहे.

वाचा:

तांबे यांनी म्हटले आहे की, ‘दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारांनी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. खरे पाहिले तर फटक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे. या व्यावसायात मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग अवलंबून आहे. त्यांनी यावर्षीही मोठ्या प्रमाणावर माल घेतला आहे. मात्र, मित्रांनो पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून आता थोडे नुकसान झाले तरी चालेले. मात्र, येणाऱ्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे.’

दरवर्षी शाळा महाविद्यालयांतून आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत फटाक्यांविरूद्ध प्रबोधन मोहीम राबविली जाते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. यावर्षी मात्र करोनाच्या संकटामुळे या मोहिमेला अधिक जोर आल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता राजकीय क्षेत्रातील मंडळीही यामध्ये सहभागी होत आहे. मात्र, करोनाचे संकट असले तरी यावर्षीही फटाके विक्रेत्यांना पूर्वीच परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदीही झाली असून विक्रीलाही सुरवात झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here