म. टा. प्रतिनिधी, : भाऊ दारू पिऊन वडिलांना शिवीगाळ करू लागल्याने त्याला रोखणाऱ्या बहिणीवर तलवारीने वार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (४ नोव्हेंबर) रात्री शितळानगर, देहू रोड येथे घडला. तबस्सूम रेहमान शेख (वय २१) असे जखमी बहिणीचे नाव आहे.

याबाबत देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार शाकीर हिदायत शेख (वय २४) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख त्यांच्या माहेरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांचा आरोपी भाऊ शाकीर दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे शेख यांनी भावाला वडिलांना शिवीगाळ करण्यापासून रोखले. त्यामुळे चिडलेल्या शाकीर याने शर्टमध्ये लपवलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. त्यात शेख जखमी झाल्या आहेत.

हडपसरमध्ये सुरक्षारक्षकाची हत्या

येथे सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी हडपसरमधील भोसले गार्डनशेजारील कापरे मळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता साहेबराव कांबळे (वय ५६, रा. माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. शोभा दत्ता कांबळे (वय ५१) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता कांबळे हे माळवाडी येथे राहतात. ते सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने ते घरीच होते. बुधवारी दुपारी दीड वाजता मुलाकडून पन्नास रुपये घेऊन घराबाहेर गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. गुरुवारी सकाळी दहा वाजता कापरे मळा येथे त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या तोंडावर दगडाने मारहाण करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here