‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत आतापासूनच आपल्या मनाची तयारी करा. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. करोना रुग्णांसाठी ती बाब अधिक धोक्याची आहे. त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी केली गेली पाहिजे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले होते.
वाचा:
रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी केलेल्या आवाहनाचं मी स्वागत करतो. फटाके वाजवून प्रदूषणात भर घालण्याऐवजी हेच पैसे एखाद्या गरजू कुटुंबाला देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हातभार लावला तर दिवाळीच्या आपल्या आनंदात निश्चितच भर पडेल,’ असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं केली आहे. या निर्णयामुळं सध्या काही घटकांचे नुकसान होणार असले तरी पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे,’ असं तांबे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times