पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. तिचा पती खासगी काम करतो. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. डेली कलेक्शनसाठी हितेश हा महिलेच्या कार्यालयात यायचा. त्यामुळे महिला व त्याची ओळख आहे. हितेशने तिला आर्थिक मदत केली. त्यामुळे त्याचे महिलेच्या घरी जाणे-येणे वाढले. काही दिवसांपूर्वी हितेश महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेला शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने नकार दिला. मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन हितेशने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर तो सतत अत्याचार करायला लागला.
हितेशचा छळ असह्य झाल्याने महिलेने पतीला घटनेची माहिती दिली. पतीसह नंदनवन पोलिस स्टेशन गाठून महिलेने तक्रार दिली. पोलिसांनी हितेशविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन महिन्यांपूर्वी महिला, तिचा पती व साथीदारांनी हितेशला मारहाण केली होती. त्याच्याकडून १३ हजार रुपये हिसकावले होते, अशीही माहिती आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times