मुंबई: राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं अद्यापही निर्णय न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवताना मुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत मनसेचे नेते यांनी सरकारवर तोफ डागली आहे. ‘पुनश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला च कोंडून ठेवता,’ असा खोचक सवाल नांदगावकर यांनी केला आहे.

करोनाच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी सुरू झालेल्या ‘अनलॉक’चा सध्या पाचवा टप्पा सुरू आहे. शाळा, लोकल आणि मंदिरे वगळता जवळपास सर्वच गोष्टींना सरकारनं परवानगी दिली आहे. राज्यातील थिअटर, जलतरण तलाव, इनडोअर खेळांनाही काही मर्यादेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वारंवार मागणी करून प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत सरकारनं निर्णय घेतलेला नाही. भारतीय जनता पक्ष सातत्यानं या मुद्द्यावर आंदोलन करत आहे. मनसेनंही या संदर्भात मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारनं अद्याप या मागणीची दखल घेतलेली नाही. त्यामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून या संतप्त भावनांना वाट करून दिली आहे. ‘आधी बार उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला. नंतर बारची वेळ देखील वाढवून दिली गेली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सला परवानगी देण्यात आली आहे. मग करोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा यामागे हे कोडेच आहे,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

‘हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे,’ असंही त्यांनी निदर्शनास आणलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here