म. टा. प्रतिनिधी, : शहराच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज, शुक्रवारी कामगार नेते केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आळंदीतील महाराजांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला.

पिंपरी-चिंचवड उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाली. कामगार नेते केशव घोळवे यांची निवड झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कामगारांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन दोघा चोरट्यांनी हात साफ केले. यावेळी घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी आळंदीतील महाराज आले होते. त्यांच्या खिशावरही चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घालताना एका व्यक्तीने या दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन बोलावले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मात्र, याबाबत अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दिलेली नाही. या संशयित आरोपींकडे काहीही सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी या मुलांना पोलीस ठाण्यातच ठेवले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

राष्ट्रवादीने बहुमत नसताना उपमहापौर निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. त्यामुळे महापालिका भवनात आज अधिक गर्दी होती. राजकीय हालचालींनंतर घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर कार्यकर्ते आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांनी उपमहापौर दालनात गर्दी केली. यावेळी दोघे तरूण उपमहापौरांच्या दालनात आले होते. गर्दीत आळंदीच्या वारकरी पंथांच्या महाराजांच्या खिशातून पैशांचे पाकीट काढले. तसेच दुसऱ्या एकच्या खिशातून पाकीट काढत असताना एका कार्यकर्त्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने दोघांना जाब विचारत सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. केटरिंगचे काम करण्यासाठी अन्य जिल्ह्यातून हे दोन्ही तरूण पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. मात्र, ते महापालिका भवनात थेट तिसऱ्या मजल्यावर का आले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आज महापालिका भवनात राज्यातील विविध भागांतून भाजप कार्यकर्ते आले आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here