घरातील टीव्ही बंद करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर मुलाने वडिलांना गोळ्या घातल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर जण बाहेर धावत आले. वयोवृद्ध वडील जमिनीवर कोसळले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसीरपूरमध्ये ही घटना घडली. लालाराम कटिहार (वय ८०) हे लष्करातून निवृत्त झालेला आपला मुलगा अशोक कटिहार याच्यासोबत राहत होते. बुधवारी संध्याकाळी लालाराम कटिहार हे नातू ऋषभ याच्यासोबत टीव्ही पाहत होते. त्याचवेळी नशेत धुंद असलेले अशोक घरी आले. त्यांनी टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र, थोड्या वेळाने टीव्ही बंद करतो असे लालाराम यांनी सांगितले. त्यावर त्याने त्यांच्याशी वाद घातला. तसेच ऋषभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा वाचवण्यासाठी लालाराम पुढे आले. त्यावर संतापाने लालबुंद झालेल्या अशोकने घरातील बंदूक आणली आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या.
कानपूर देहातचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांनी सांगितले की, टीव्ही बंद करण्यावरून लालाराम आणि त्यांचा मुलगा यांच्यात वाद झाला. त्यानंतर अशोकने आपल्या वडिलांना गोळ्या घालून ठार केले. घटनास्थळावरून बंदूक हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times