वाचा:
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा तसेच तत्काळ आपल्याला जामीन मिळावा, यासाठी अर्णब यांच्यावतीने हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे.
वाचा:
अर्णब यांच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी वेळी तक्रारदार आज्ञा नाईक, सरकारी पक्ष आणि पोलिसांची बाजू ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने नमूद केले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली. त्यानंतर ‘आज सुनावणी पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या दुपारी ११ वाजता आम्ही पुन्हा सुनावणी ठेवू, असे नमूद करत कोर्टाने अर्णब यांना आज कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही.
वाचा:
साळवे यांचा युक्तिवाद
‘अशाप्रकारच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाला अनुच्छेद २२६ अन्वये असलेल्या विशेष अधिकारांतर्गत फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३ अन्वये आरोपीला तात्काळ सुटका करण्याचा आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हवे तर हायकोर्ट आवश्यक त्या अटी घालून गोस्वामींची सुटका करू शकते’, असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी गोस्वामी यांच्यावतीने केला. अलिबागच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात प्रथमदर्शनी जे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचा आधार घेऊन हायकोर्ट गोस्वामी यांच्या सुटकेचा आदेश तात्काळ काढू शकते, असेही साळवे यांनी नमूद केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times