पिंपरी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक आणि विडंबन करणारी छायाचित्रे पोस्ट केल्याप्रकरणी ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करण्यात आला. ( Offensive On Latest Updates )

आणि (पत्ता उपलब्ध नाही) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शहर भाजपचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक गणेश जवांदवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब जमादार याने चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र क्रॉप करून आपल्या फेसबुक अकाउंटवरून बदनामीकारक मजकुरासह प्रसिद्ध केले. कोरेकर पाटील याने ते शेअर केले होते. याप्रकरणी भाजप स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संघटक सरचिटणीस थोरात, पदाधिकारी राजू दुर्गे यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोर्टाची परवानगी लागते. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी याबाबत कोर्टाकडे परवानगी मागणार असल्याचे सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here