दिल्लीत गेल्या २४ तासांमधील पॉझिटिव्हीटी दर १२.१९ टक्के इतका आहे. तर दिल्लीत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३९ हजार ७२२ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख २३ हजार ८३१ जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६१२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार २७६ रुग्ण बरे झाले आहेत.
तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ८९.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा दर ९.३७ टक्के इतका आहे. दरम्यान, दिल्लीत होम आयसोलेशनमध्ये एकूण २३ हजार ६७९ रुग्णांना ठेवण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत एकूण ३ हजार ७५४ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा
महाराष्ट्रात
मुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. आज १६१ करोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, दिवसभरात ५०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले. त्याच प्रमाणे ११ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाखापर्यंत खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times