वाचा:
सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची निवड झाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उदयनराजे पालिकेत आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत विचारले असताना त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत कुणाचाही नामोल्लेख न करता ज्येष्ठ मराठा नेत्यांना लक्ष्य केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार राजकारण होत असल्याने हे आरक्षण मिळेनासे झाले आहे. योग्य वेळ आल्यावर या विषयावर मी बोलणारच आहे. पण महाराष्ट्रात माझ्यापेक्षा राजकारणात वडीलधारी मंडळी आहेत. गेल्या ३० वर्षात त्यांनी या विषयावर का आवाज उठविला नाही, हा आमच्या सारख्यांचा प्रश्न आहे, असे उदयनराजे म्हणाले. मराठा आरक्षणावर योग्य भूमिका घेतली गेली नाही तर उद्रेक होईल. लहानपणीचे मित्र आरक्षणामुळे एकमेकांकडे संशयाने पहात आहेत. या विषयावर उगाच अहंभाव बाळगणाऱ्यांच्या वाऱ्याला सुद्धा मी उभा राहणार नाही. मात्र ही माझी वैयक्तिक मते आहेत. माझ्या मतांवर अनेक मतांतरे होणार हे मला ठाऊक आहे, असे नमूद करत मी जे बोलतो ते आंतरिक तळमळीने बोलतो असे उदयनराजे म्हणाले.
वाचा:
जात पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारताना कधी जातीचा विचार केला नाही, असे नमूद करतानाच १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या मग त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही?, असा सवाल उदयनराजेंनी केला. मराठा आरक्षणात राजकारण केले जात असल्याने प्रत्यक्षात ते लागू होण्यासंदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत, असा आरोप करताना आरक्षण दिले नाही तर स्वस्थ बसणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times