अहमदनगर: साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू झालेल्या वादात आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही उडी घेतली आहे. ‘साईंच्या जन्मस्थळावरून निर्माण करण्यात आलेला वाद हे सरळ साधे प्रकरण नाही. हा वाद केवळ आर्थिक नाही. सर्वसमावेशक देव व प्रतिकांच्या अपहरणाचा हा डाव आहे,’ असा घणाघात तांबे यांनी विरोधकांवर केला आहे.

पाथरी हे साईंबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा अलीकडंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरू झाला. साईबाबांचे जन्मस्थ अज्ञात आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चुकीचा उल्लेख करू नये. आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी शिर्डीकरांनी केली. त्यासाठी शिर्डी बंदही पुकारण्यात आला. आता तो मागे घेण्यात आला आहे. आज या प्रश्नी शिर्डीवासीयांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. असं असलं तरी यावरून राजकारण सुरूच आहे.

वाचा:

वाचा:

सत्यजीत तांबे यांनी या वादाप्रकरणी ट्विटरवरून भाष्य केलं आहे. ‘शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद फक्त आर्थिक नाही. साईबाबा हे सर्वसमावेशक संत व देव मानले जातात. विसाव्या शतकात लोकांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला हा सर्वधर्मी देव आहे. बाबांनी त्यांच्या हयातीत ते कोण, कुठले याची माहिती कधीही दिली नव्हती. उलट मी सर्वांचा आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. लोकांनाही ते पटलं. मात्र, आता २१ व्या शतकात त्यांची जात, धर्म याबद्दल दावे केले जात आहेत. हे सरळ साधे प्रकरण नाही. सर्वसमावेश देवाच्या अपहरणाचा डाव आहे,’ असं तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तांबे यांचा रोख विरोधी पक्ष भाजपकडं असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या आरोपांना आता विरोधक काय उत्तर देतात, हे पाहावं लागणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here