वाचा:
दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच करोना साथीचे आकडे वेगाने खाली येत असल्याने आरोग्य यंत्रणेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच साजरी करत असताना करोनाच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून गर्दी टाळल्यास करोनावर वेगाने नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणाही खबरदारी बाळगत आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत.
राज्यात आज ११ हजार ६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ करोना बाधित रुग्णांनी या आजाराला मात देण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.३५ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५ हजार २७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख १८ हजार ५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १० हजार ३१४ (१८.३५ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १० लाख ५९ हजार ४९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ८ हजार ८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
– राज्यात सद्यस्थितीत करोनाचे १ लाख २ हजार ९९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २२ हजार ७१७ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबईत १६ हजार ८१७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर ठाण्यात हाच आकडा १५ हजार ८७ इतका आहे.
– आज नोंद झालेल्या एकूण १६१ मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू सातारा- १३ पुणे – ११, सोलापूर – ५, नांदेड- ५, – ४, गोंदिया – ४, अहमदनगर -२, बुलडाणा – २, नाशिक – २, जळगाव – १, कोल्हापूर -१ आणि सांगली -१ असे आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times