Management row: पाकिस्तानने करतारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन एका बिगर शीख ट्रस्टकडे सोपवल्यानंतर भारताने तीव्र विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानचा हा निर्णय एकतर्फी आणि मनमानी असून शीख धर्मीयांच्या भावनांच्या तो विरुद्ध आहे आणि म्हणून तो निर्णय तत्काळ परत घ्यावा, असे भारताने म्हटले आहे.

नवी दिल्ली: करतारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन गैर-शीख ट्रस्टच्या हाती सोपवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला असून, या निर्णयाचा भारताने कडाडून विरोध दर्शवला आहे. हा निर्णय मनमानी असून पाकिस्तानने तो तत्काळ मागे घ्यावा, असे भारताने म्हटले आहे.

पाकिस्ताने घेतलेला हा निर्णय शीख समुदायाच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असल्याचे पाकिस्तानी मिशनचे प्रभारी आफताब हसन खान यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

पाकिस्तान सरकारने करतारपूर साहिबचे प्रबंधन आणि देखभाल करण्याचे काम पाकिस्तानी शीख गुरुद्वारा प्रबंधन समितीच्या (पीएसजीपीसी) हातून काढून घेत ते एका बिगर शीख संस्था ‘इवेक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’कडे (ईटीपीबी) वर्ग केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली.

पाकिस्तानने घेतलेला एकतर्फी निर्णय हा अतिशय निंदनीय आहे आणि करतारपूर साहिबला मानणाऱ्या लोकांच्या भावनेच्या विरोधात आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. हा निर्णय शीख समुदायाच्या धार्मिक भावनांच्या विरोधात आहे, असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
दोन्ही देशांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात गुरुद्वारा करतारपूर साहिबपासून ते भारतातील गुरदासपूर मध्ये डेरा बाबा साहिबपर्यंत लोकांना जोडण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते. ४ किलोमीटर लांबीचा करतारपूर कॉरिडोर पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील गुरुद्वारा करतारपूर साहिबशी एकमेकांना जोडतो. करोना विषाणू संसर्गाचे संकट आल्यानंतर हा कॉरिडोर मार्चपासून बंद करण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here