म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

यांनी अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असतानाच, हा गुन्हा ‘ए समरी’ म्हणजे गुन्ह्याच्या तपासात काही पुरावे न आढळून आल्याने तो बंद करण्यात आला असतानाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याचा तपास कसा काय सुरू केला, असा सवाल अर्णवसमर्थक विचारत आहेत. मात्र ‘ए समरी’ केलेल्या या गुन्ह्याची पुन्हा चौकशी करण्यासाठी न्यायालयाची योग्य ती परवानगी घेतल्याचे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

एखाद्या गुन्ह्यात तपासाअंती काही तथ्य आढळत नसल्यास त्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यासाठी ‘ए समरी’ केली जाते. मात्र ‘ए समरी’ केलेल्या गुन्ह्याबाबात तोंडी अथवा परिस्थितीजन्य काही पुरावा पुन्हा सापडल्यास त्याचा तपास पुन्हा सुरू करता येतो. मात्र, त्यासाठी दंडाधिकाऱ्यांची परवानगी लागते. ही परवानगी या गुन्ह्याबाबत घेतलीच गेली नसल्याचे वारंवार सोशल मीडिया, तसेच काही प्रसारमाध्यमांतून दाखविले जात आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. वास्तविक पाहता अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी कलम १६४ अन्वये दंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात पुन्हा चौकशी करण्यासाठी न्यायालयाची परवानगीही घेतली असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. कायदा आपले काम करेल, इतकेच ते म्हणाले. मात्र, या प्रकरणात जाणीवपूर्वक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्यात येत असल्याचा आरोप आपल्यावर केला जात आहे, असे त्यांना विचारले असता. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे चौथ्या स्तंभावर हल्ला करत नाही. किंबहुना चौथ्या स्तंभाचे पावित्र्य व स्वातंत्र्य जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, कायद्यासमोर सारे समान असतात. एखाद्या फौजदारी गुन्ह्यात कायद्यानुसारच निवाडा होतो. तसेच त्यात प्रशासनाची भूमिका ही कायम निःपक्षपाती असावी लागते व त्या कसोटीवर सरकार कुठेही कमी पडलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here